VIDEO : पुण्यातील ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा शिवसेनेला रामराम; हिंदू महासंघाच्या माध्यमातून मनपा निवडणूक लढवणार - Hindu Mahasangh new party
पुणे - शिवसेनेचे पुणे शहर समन्वयक आणि ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आंनद दवे ( Brahmin Mahasangh President Anand Dave ) यांनी शिवसेनेला रामराम केला आहे. त्यांनी हिंदू महासंघ या नव्या पक्षाची ( Hindu Mahasangh ) आज घोषणा केली. येणाऱ्या महापालिका निवडणुका हिंदू महासंघ लढवणार आहे. खुल्या प्रवर्गाला खुळा समजून त्याचा खुळखुळा करणाऱ्यांना उत्तर देणार राजकीय व्यासपीठ असल्याचं यावेळी दवे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. पाहा, पक्षाचे उद्घाटन, राजकीय पक्षाची विचारधारा याबाबत त्यांनी ईटीव्ही भारतसोबत साधलेला संवाद.