पूर्ण नियोजन करूनच पाठवण्यात आली लस; विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली माहिती - कोवीशिल्ड लस विमान वाहतूक
पुणे - जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना महामारीला संपवण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. 'कोवीशिल्ड' लसीचे डोस आज पहाटे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून विमानतळाकडे रवाना झाले. त्यामुळे देशातील नागरिकांना कोरोनाची लस मिळण्याची प्रतिक्षा संपली आहे. १६ तारखेपासून लसीकरण सुरू होणार आहे. पुण्यातील लोहगाव विमानतळावरून कोरोना लसीचे बॉक्स देशातील विविध राज्यात पोहचवले जाणार आहेत. याबाबत विमानतळ अधिकारी प्रसन्न मिस्त्री यांनी अधिक माहिती दिली.