जनता कर्फ्यू : एसटी बसमध्ये शुकशुकाट, वाशिम - अमरावती बसमध्ये फक्त ६ प्रवासी - जनता कर्फ्यू अमरावती आढावा
अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी रविवारी देशभरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. एरवी वाशिमहून अमरावतीला जाणाऱ्या महामंडळाच्या बसद्वारे हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, रविवारी बसमध्येही शुकशुकाट पाहायला मिळाला. वाशिमवरून अमरावतीपर्यंत फक्त सहाच प्रवाशांनी प्रवास केला. एकंदर ग्रामीण भागातील नागरिकांनीही जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला.