VIDEO : बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण द्या - इस्कॉन - etv bharat live
जालना - बांगलादेशातील हिंदू मंदिर हिंदू धर्माचे लोक असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षा द्या या मागणीसाठी शनिवारी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इस्कॉन संघटनेसह हिंदुत्ववादी संघटनांनी कीर्तन प्रदर्शन केले. हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध नोंदवला. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू असून त्यांच्या मानवाधिकारवर गदा आणली जात आहे. त्यामुळे तेथील सरकारने हिंदू देवस्थान आणि हिंदूंना सुरक्षा द्यावी झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून तेथील सरकारने काळजी घ्यावी अशी मागणी यांच्यावतीने संयुक्त राष्ट्र संघटनेकडे केली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने हस्तक्षेप करावा अशी देखील इस्कॉन संघटनेची मागणी आहे. आंदोलकांनी म्हटलंय बांगलादेशातील हिंदूंना त्रास देणे हा कटकारस्थान असल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केला आहे.