राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतले एन.डी. पाटील यांचे अंत्यदर्शन; म्हणाले... - Shetkari Kamgar Paksha leader ND Patil
कोल्हापूर - पुरोगामी चळवळींचे नेते, बहुजनांसाठी लढणारे प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची दुपारी बारा वाजता प्राणज्योत ( Prof N D Patil passes away ) मालवली. त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान, शरद पवार आणि पाटील यांचे अतिशय खास असे संबंध होते. त्यामुळे ही बातमी कळतात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले. कोल्हापूरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी एन डी पाटील यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली ( Sharad Pawar took N.D. Patil funeral ) वाहिली. यावेळी शरद पवार यांनी एन.डी. पाटील यांचे पुरोगामी विचार त्यांची पुढची पिढी असेच चालू ठेवेल असा विश्वास व्यक्त केला.