अजित पवारांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारविरोधात बारामतीत घोषणाबाजी - ncp agitation marathi news
बारामती - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांसह विविध साखर कारखान्यांवर आयकर विभागाने आकस्मित छापे टाकून तपासणी सुरू केली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ व केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. अंबालिका, दौंड शुगर, जरंडेश्वर, आयान साखर कारखान्यांसह बारामती औद्योगिक वसाहतीतील कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या आयकर विभागाकडून तपास केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर 'एकच वादा अजित दादा' 'अजितदादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है' तर केंद्र सरकारच्या निषेधार्थ जब तक भाजपा डरती है... ईडी को आगे करती है... असे म्हणत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.