विशेष मुलाखत! 'अर्थव्यवस्थेमध्ये विश्वास निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलंय' - पृथ्वीराज चव्हाण बातमी
मुंबई - सध्या राज्यात उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यात, जरी आता हे उद्योगधंदे पुन्हा चालू केले तरी त्यातून तयार होणारा माल कोण खरेदी करणार, हा प्रश्न आहे. याचे कारण लोक फक्त जिवनावश्यक वस्तू खरेदी करत आहेत. इतर वस्तू खरेदी करण्याकडे त्यांचा कल नाही. याचे कारण त्यांना शाश्वती नाही की, त्यांचा पगार, नोकरी उद्या असेल की नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेत विश्वास निर्माण करणे आवश्य आहे. पण, सरकार त्यात अयशस्वी ठरल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. यावर उपाय म्हणून सरकारने कर्ज काढावे, गरज पडल्यास नोटा छापाव्यात आणि लोकांना थेट मदत करावी, असे चव्हाण यांनी सांगितले.