Video : कांद्या पाठोपाठ भाजीपाल्याचे भाव वाढले; मिरची 125 रूपये प्रतिकिलो
नाशिक - जिल्ह्यासह राज्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत भाजीपाला कमी येत असल्याने किरकोळ बाजारात शिमला मिरची 125 रुपये, वाटाना 240 रुपये, वांगे 120 रुपये, भेंडी 80 रुपये तर कोथिंबीर 120 रुपये, मेथी 50 रूपये जुडीने विक्री होत आहे. ऐन सणासुदीत पेट्रोल, डिझेल पाठोपाठ भाजीपाल्यांचे भाव वाढल्याने नागरिकांचा महिन्याचा बजेट कोलमडला आहे. किरकोळ बाजारात नेमकी काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी कपिल भास्कर यांनी.