समीर वानखेडे प्रकरणावर रामदास आठवलेंची पत्रकार परिषद, पहा काय म्हणाले आठवले - Ramdas Athavale
मुंबई - समीर वानखेडे हे दलित असून त्यांनी कोणतेही धर्मांतर केलेले नाही. तरी, त्यांच्या कुटुंबाला विनाकारण बदनाम करु नये अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे. एनसीबीचे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि पत्नी क्रांती रेडकर यांनी नुकतीच आठवले यांची मुंबईत त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. त्यामध्ये त्यांनी वारंवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या आरोपांबाबत आपली बाजू मांडली. तसेच, आपल्याला यामध्ये सहकार्य करावे अशी विनंती केली. त्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.