अमरावतीत कोविड लसीकरणाची तयारी पूर्ण - अमरावती कोविड लसीकरण न्यूज
अमरावती - जिल्ह्यात आज लसीकरण सुरू होत आहे. लसीकरणासाठी पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्हा सामान्य रूग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या पाच केंद्रांवर प्रत्येकी 100 लाभार्थ्यांप्रमाणे 500 लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. याच लाभार्थ्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. या लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी...