पारंपरिक पद्धतीने आज कोल्हापुरात ऐतिहासिक शाही दसरा सोहळा, तयारी पूर्ण - etv bharat marathi
कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी मोठ्या उत्साहात सीमोल्लंघनाचा ऐतिहासिक दसरा सोहळा पार पडणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती यांनी याबाबतचे पत्रक काढून जनतेला माहिती दिली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झाला असला तरी नियमांचे मात्र काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. या संपूर्ण सोहळ्याची आता तयारी पूर्ण झाली आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे दसरा चौकातील सीमोल्लंघनाचा सोहळा रद्द करावा लागला होता. हा सोहळा जुना राजवाडा येथे काही मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, यावर्षी प्रशासनाने घातलेल्या विविध नियमांचे पालन करून परंपरेनुसार हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्ट तैनात करण्यात आला आहे. याच सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...