कटंगी डॅममध्ये मान्सून पूर्व तयारीची रंगीत तालीम - मान्सूनपूर्व रंगीततालीम
गोंदिया - या वर्षी मान्सूनपूर्व तयारी 2021 च्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गोंदियातर्फे पूर परिस्थितीमध्ये शोध बचाव कार्य आयोजित करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कटंगी डॅममध्ये शोध व बचाव कामाची रंगीत तालीम घेण्यात आली. मागील वर्षी 2020 मध्ये जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक तालुक्यात नागरिकांसाठी सुरक्षा व बचाव कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. पूर परिस्थिती मध्ये जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गोंदियातर्फे सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने नागरिकांना पूरपरिस्थिती मध्ये तात्काळ मदत पुरविण्यासाठी जिल्हा शोध व बचाव चमू तर्फे रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी नागपूर येथून आलेले मोजेस कॉन्द्रा, निकेश चिखलोंडे शोध बचाव पथकाचे सदस्य किशोर टेंभुर्णे, नरेश उके, राजकुमार बोपचे, जसवंत रहांगडाले, रवि भांडारकर, संदीप कराडे, दिनू दिप, इंद्रकुमार बिसेन चुंन्नीलाल मुटकुरे, चिंतामण गिरेपुंजे आदी उपस्थित होते. मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने गावपातळीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. हवामान खाते व पूर परिस्थिती संदर्भात नागरिकांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्यात येत होती.
Last Updated : May 30, 2021, 4:35 PM IST