VIDEO : आर्यन खानच्या सुटकेसाठी मशिदीत प्रार्थना; चादरही चढवली - मशिदीत प्रार्थना
नवी दिल्ली - क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणी किंग खान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली. आर्यन खान मागील 18 दिवसांपासून तुरुंगात आहे. न्यायालयाने अद्यापही आर्यनचा जामीन मंजूर केलेला नाही. त्यामुळे आज दुपारी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. आर्यनला लवकर जामीन मिळून त्याची सुटका व्हावी, अशी प्रार्थना दिल्लीतील एका मशिदीत करण्यात आली. यासंदर्भातील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.