VIDEO : भर रस्त्यावर गुंडांची दहशत, वाहनांवर कोयत्याने हल्ला - चेतन जावरे पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात दोन तरुणांनी भर रस्त्यात वाहनांवर हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. सांगवी पोलिसांनी आरोपींना गजाआड केलं आहे. प्रतीक संतोष खरात आणि चेतन जावरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळ निळख परिसरात मुख्य रस्त्यावर आरोपींनी धिंगाणा घालत वाहनांवर कोयत्याने हल्ला चढवला. ही घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यातील एक आरोपी वाहनांना थांबवायचा तर दुसरा दिसेल त्या वाहनांवर कोयत्याने वार करायचा. असा प्रकार काही मिनिटे सुरू होता. रस्त्यावरील हा भीतीदायक प्रकार बघून काही वाहनचालकांनी परत जाणे पसंद केले. तर, काहीजण हा थरारक प्रकार बघत होते. परंतु, त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर आर्म ऍक्ट आणि खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.