खडूवर राष्ट्रगीत कोरणारा अवलिया - video special story
फळ्यावर तसेच पाटीवर लिहिण्यासाठी सामान्यपणे खडूचा वापर केला जातो. यापलीकडे खडूचा फारसा उपयोग होत नाही. मात्र, कर्नाटकच्या होन्नावर तालुक्यातील गेरुसोप्पा बासाकुली या गावातील प्रदीप मंजुनाथ नाईक या तरुणाने मात्र खडूवर देशाचं राष्ट्रगीत कोरलं आहे. एकूण 17 खडूंवर त्यानं राष्ट्रगीत कोरले आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याच्या या विक्रमाची नोंदही झाली आहे. 'इच्छा तेथे मार्ग' या म्हणीनुसार प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोणतंही कठीण काम करता येतं हे प्रदीपनं दाखवून दिलंय. इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर त्यानं इवल्याश्या खडूवर राष्ट्रगीत कोरलं आहे.कर्नाटच्या गेरुसोप्पा-बासाकुली या गावात राहणाऱ्या प्रदीपनं होन्नावरमधील एसडीएम कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलंय. सध्या तो कारवारच्या बाडा इथल्या शिवाजी शिक्षा संस्थानमध्ये बी.एडचे शिक्षण घेत आहे.