बँड व्यवसाय ठप्प, हार न मानता सुरू केला नवीन व्यवसाय - pune lockdown affect news
पुणे - कोरोनाने देशाच्या अर्थव्यवस्थेपासून सर्वसामान्य माणसाचे आर्थिक गणित बिघडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यात आत्ता दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेच भाकीत देखील वर्तविले गेले आहे. मागील वर्षापासून व्यवसाय ठप्प असल्याने पुढेही व्यवसाय पूर्वपदावर येईल, असे काही चित्र दिसत नसल्याने अनेक जण पर्यायी मार्ग शोधत आहेत. पुण्यातील प्रभात बँडनेही पर्यायी व्यवसाय सुरू केला आहे.