आता प्रभाकर कसा दिसतोय माहित नाही - हिरावती साईल - hirawati sail
मुंबई - मागील चार महिन्यांपासून प्रभाकरचा एक फोन कॉलही आलेला नाही, अशी प्रतिक्रिया प्रभाकर साईल यांच्या मातोश्री हिरावती साईल यांनी दिली आहे. चार महिन्यांपूर्वी मला नोकरी लागली, असे म्हणत त्याने बॅग भरली आणि घर सोडले. त्यानंतर तो कोठे राहतो, काय काम करतो, सध्या कसा दिसतो याबाबत काहीच माहित नसल्याचे हिरावती साईल यांनी सांगितले. त्यांना आर्यन खान प्ररकरणाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, आर्यन खान, किरण गोसावी आणि मुलगा प्रभाकर याबाबत मला बातम्यांद्वारे कळाले. तेव्हापासून माझी तब्येत खराब झाली आहे.