बिहार निवडणूक : मुख्यमंत्री कोण हे पाहणे मनोरंजक होणार - राजकीय विश्लेषक उदय तानपाठक - bihar assembly election 2020 result
मुंबई - बिहार निवडणुकीत नितीशकुमार सरकार जाऊन तेजस्वी यादव यांचे सरकार येईल, असे एक्झिट पोलवर दाखवण्यात आले. मात्र, एनडीए आघाडीवर आहे. त्यातच भाजप, जेडीयु पेक्षा अधिक जागा जिंकत असल्याने बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण हे पाहणे फारच मनोरंजक होणार आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी व्यक्त केले आहे.