मालेगाव प्रकरणात पोलिसांनी सुमोटो कारवाई करावी - मंत्री यशोमती ठाकूर - Malegaon molestation case
अमरावती - नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील एका बाजारपेठेत महिला खरेदी करत असताना, एका विकृताने त्या महिलेच्या मागे उभे राहून तीच्या अंगाला वारंवार स्पर्श केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील वेगाने व्हायरल झाला आहे. मात्र, या प्रकरणी महिलांनी कुठलीही तक्रार दाखल न केल्यानें पोलिसांत गुन्हाही दाखल झाला नसून, आरोपीही मोकाट आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुमोटो अंतर्गत कारवाई करावी, असे मंत्री याशोमती ठाकूर म्हणाल्या.