मुंबई-ठाण्याच्या सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त; विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई - thane curfew news
ठाणे - राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या पाहता कोरोनाची साखळी तोडता यावी, यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली. यादरम्यान, अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना या निर्बंधातून सुट देण्यात आली असली तरी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक जण विणाकारण फिरतात. अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुलुंड टोल नाका परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला पाहायला मिळाला. यासगळ्या संदर्भात 'ईटीव्ही भारत'ने आढावा घेतला.