VIDEO: कोल्हापुरात लावली म्हशींची शर्यत, पोलीस येताच ठोकली धूम - कोल्हापूर म्हैस शर्यत व्हिडिओ
कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात दिवसा जमावबंदी आहे. मात्र, तरीही कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या काठावर म्हशींची शर्यत लावली होती. ही शर्यत पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी देखील केली होती. मात्र, ही गोष्ट पोलिसांना कळताच पोलीस पंचगंगेच्या तीरावर दाखल झाले. पोलिसांचा अॅक्शन मूड पाहताच काही वेळापूर्वी म्हशींना पळवणाऱ्या नागरिकांसह प्रेक्षकांनी धूम ठोकली. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.
Last Updated : Apr 14, 2021, 3:09 PM IST