VIDEO : पोळ्याला इथे बैलाची नाही तर 'या' प्राण्याची केली जाते पूजा; अमरावतीच्या रासेगावमध्ये मागील 25 वर्षांची परंपरा - गाढव पोळा माहुरे कुटूंब रासेगाव अमरावती
अमरावती - सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा. या दिवशी बैलाची पूजा केली जाते. मात्र, अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे पोळ्याला गाढवांची पूजा करण्याची परंपरा आहे. ज्याप्रमाणे पोळ्याला बैलाचा साज केला जातो. तसीच सजावट गाढवांची करण्यात येते. इतकेच नाही तर गाढवांना पुरणपोळीही भरविली जाते. रासगावमध्ये माहुरे कुटूंब गेल्या २५ वर्षांपासून पोळ्याला गाढवाची पूजा करत आहेत. माहुरे यांचेकडे जवळपास १५ गाढव आहेत. ही गाढवे बैलासारखी कामे करतात त्यामुळे पोळ्याला त्यांची पूजा केली जाते. पाहा, व्हिडिओ...
Last Updated : Sep 6, 2021, 9:53 PM IST