औरंगाबादमधील मंदिरे आणि मशिदी उघडल्या... - Places Of Worship in Aurangabad
औरंगाबाद - राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट होत असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यातच भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर उघडावी अशी मागणी राज्यभरातून करण्यात येत होती. त्यानंतर राज्य सरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर आज पासून मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादमधील मंदिरे आणि मशिदी उघडण्यात आल्या आहेत. याबाबत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने घेतलेला आढावा...