VIDEO : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी घोटाळ्याची चौकशी व्हायला पाहिजे - संजय राऊत - पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी घोटाळा
मुंबई - पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. त्यामध्ये कोण आहे कोणत्या मोठ्या नेत्यांच्या आजूबाजूला फिरणाऱ्या क्रिस्टल कंपनीला नियम धाब्यावर बसवून घोटाळा झाला आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. जे घोटाळे उघड करत आहेत, त्यांना त्याची कागदपत्रे देत आहे. त्यांनी यावर अभ्यास करावा. राजकीय पक्ष कोणीही असो तो घोटाळा असतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.