Pune BJP Agitation : 'नाना पटोलेंना भर रस्त्यात तुडवून काढू'; पिंपरी-चिंचवडच्या महापौरांची पटोलेंवर टीका - पिंपरी चिंचवड महापौर नाना पटोले वक्तव्य
पुणे - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी नावाच्या व्यक्तीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी तर पटोलेंना भर रस्त्यात तुडवून काढू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरीत नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात त्या बोलत होत्या.