पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होऊनही भाव शंभरी पारच; नागरिकांमध्ये नाराजी - Dissatisfaction among citizens
पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठला होता. देशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर 120 रुपये तर डिझेलचे दर ही शंभर रुपयांच्या पुढे गेले होते. पर्यंत दिवाळीच्या तोंडावर सरकारने देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पेट्रोलचे दर हे पाच रुपयांनी तर डिझेल हे दहा रुपयांनी कमी झाले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महागाईने त्रस्त झालेल्या देशवासीयांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पुण्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभर रुपये पार आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पुण्यात आज पेट्रोल 109 रुपये लिटर तर डिझेल 92 रुपये लिटरने स्वस्त झाले आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीत अजून कपात व्हायला हवी होती कारण सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असताना दिसून येत आहे अशी प्रतिक्रिया या वेळी काही नागरिकांनी दिली तर काही नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. मात्र अजूनही नाराजीचा सूर निघत आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी पुण्यातील पेट्रोल पंपावरून घेतलेला आढावा...