'देशातील नेतृत्त्वाच्या दुर्लक्षतेमुळे जनता नरकयातना भोगत आहे' - संजय राऊत यांची पत्रकार परिषद
मुंबई - इतक्या मोठ्या देशात आरोग्यविषयक अराजकता माजली आहे. हायकोर्टाने याचा उल्लेख आरोग्यविषयक आणीबाणी असा केला आहे. इतके महान पंतप्रधान, राष्ट्रपती दिल्लीत असताना ऑक्सिजन अभावी लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. हे दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. गुजरात आणि महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. हा सगळा विषय देशातील नेतृत्त्वाने गांभीर्याने घ्यायला हवा होता. परंतु ते निवडणुका आणि राजकारणाच्या पलीकडे बघायला तयार नाही, असेही ते म्हणाले.