पिंपरीतील पवना नदीने घेतला मोकळा श्वास; जलपर्णी काढल्याने नदी स्वच्छ
पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या पवना नदीमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर जलपर्णी फोफावली होती. यामुळे शहरातील आणि नदी लगत राहणाऱ्या नागरिकांना घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा सामना करावा लागला होता. तब्बल 5 कोटी रुपये खर्च करून ही जलपर्णी काढण्यात आली होती. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली, त्यात काही जलपर्णी वाहून गेली हे सत्य नाकारता येत नाही. पवना नदीमध्ये जलपर्णी असतानाचे दृश्य आणि जलपर्णीमुक्त पवना नदीचा हा ड्रोन व्हिडिओ नक्की पहा.