कोल्हापुरातील मराठा मूक आंदोलनात महिलांचाही लक्षणीय सहभाग - protest for maratha reservation
कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक येथे मूक आंदोलन पार पडले. यामध्ये संपूर्ण राज्यभरातील समन्वयक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भर पावसात सर्वांनी या आंदोलनाला उपस्थिती लावली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून महिलासुद्धा उपस्थित राहिल्या होत्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. राज्य आणि केंद्र सरकारचीसुद्धा आरक्षणाबाबत जबाबदारी आहे. त्यामुळे दोघांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे अशी प्रतिक्रिया उपस्थित महिला आंदोलकांनी व्यक्त केली. शिवाय हे केवळ मूक आंदोलन आहे संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली यापेक्षाही उग्र आंदोलन करायची आमची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबतच त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...