यावर्षी कोरोनाशी लढू, पुढच्या वर्षी जोरात पतेती साजरी करू - पतेती सण लेटेस्ट न्यूज
मुंबई - यंदा सर्व सणांवर कोरोनाचे सावट आहे त्यामुळे सण-उत्सव शांततेत व साधेपणाने साजरे होत आहेत. 16 ऑगस्टला पारशी समुदायाचा पतेती हा सण आहे. पारशी समुदाय एकदम शांत समुदाय म्हणूनओळखला जातो. 'पतेती' हा त्यांचा सर्वात मोठा सण मानला जातो. यंदा कोरोनामुळे नेहमीसारखा हा सण साजरा करता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारशी समुदाय पतेती सण कसा साजरा करणारआहेत याबद्दल डॉ. यामियार करंजीआ यांच्या कुटुंबाशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी संवाद साधला.