Param bir Singh Case : परमबीर सिंग यांचे अजामीनपात्र वॉरंट रद्द; ठाणे न्यायालयाचा निर्णय - ठाणे न्यायालयाचा निर्णय
ठाणे - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Former Commissioner of Police Param bir Singh ) यांच्या विरोधातला अटक वॉरंट ( Arrest warrant ) ठाणे न्यायालयाने ( Thane Court ) रद्द केले आहे. न्यायालयाने वॉरंट रद्द करताना परमबीर सिंग यांना दोन अटी घातल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी परमबीर सिंग यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग यांना जेव्हा तपास अधिकारी चौकशीसाठी बोलावतील तेव्हा सिंग यांनी चौकशीसाठी उपस्थित राहायचे आहे. तसेच 15 हजाराच्या वैयक्तिक जामीनावर त्यांचे वॉरंट रद्द करण्यात आले आहे. तब्बल 234 दिवसांनंतर परमबीर सिंग काल (गुरुवारी) मुंबईत दाखल झाले. त्यानंतर कांदिवलीत गुन्हे ( Kandivali Crime Branch ) शाखेच्या कार्यालयात त्यांची सात तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज (शुक्रवारी) ते ठाण्यात दाखल झालेत. ठाण्यात परमबीर यांच्यावर एकूण दोन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यात कोपरी आणि ठाणे नगर पोलीस ठाण्याचा समावेश आहे.