महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पांडवांनी जिथून स्वर्गाकडे प्रस्थान केलं ती 'पांडव चोटी' - Pandavas departed for heaven that place call pandav choti

By

Published : Jun 26, 2021, 8:02 AM IST

देवभूमी पर्यटन क्षेत्र नैसर्गिक, साहसी आणि धार्मिक पर्यटनाचं महत्त्वाचं केंद्र आहे. यातील पिथौरागढ जिल्ह्यातील दारमा दरी इथं पंचाचूली पर्वत रांग प्रसिद्ध आहे. ही पर्वत रांग पाच पर्वतांचा समूह आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये याला पंचशिरा या नावानं देखील ओळखलं जातं. तसंच स्थानिक लोक याला पांडव चोटी, असं देखील म्हणतात. असं म्हणतात की, पांडवांनी याच मार्गानं स्वर्गाकडे प्रस्थान केलं. पांडवांनी या पर्वताच्या पाच शिखरांवर चूल पेटवून शेवटचं भोजन बनविल्याची आख्यायिका आहे. त्यामुळंच याला पंचाचूली या नावानं देखील ओळखतात. कुमाऊं मधील अल्मोडा, नैनीताल, रानीखेत आणि पिथौरागढ येथील थंड हवेचं ठिकाण देखील याचं परिसरात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details