नाशिक : गोदावरी किनारी भरली चित्रकला स्पर्धा - गोदावरी नदी
नाशिक - गोदावरी किनारी अनोखी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा रंगली आहे. राज्यभरातून चित्रकार या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. चित्रकारांच्या नजरेत गोदावरी नदी कशी दिसते, असा या स्पर्धेचा विषय आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते गोदावरी किनारी बसूनच चित्रकार गोदामाईच सुंदर रूप रेखाटत आहेत. 21 ते 24 नोव्हेंबर या दरम्यान ही स्पर्धा सुरू असणार आहे. या स्पर्धेला राज्यभरातील चित्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 27 व 28 नोव्हेंबर, असे दोन दिवस या सर्व चित्रांच प्रदर्शन असणार आहे.