बीजमातेनी साकारला बियांचा गणपती बाप्पा - पद्मश्री रहेबाई पोपेरे
अहमदनगर - पारंपारिक बियाणे संवर्धनातून अकोले तालुक्याला देशात आणि विदेशात ओळख निर्माण करून देणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी बीज बँकेत विविध प्रकारच्या गावरान बिया जपल्या आहेत. त्याच बियांचा वापर करून गणपती बाप्पा साकारले आहेत. मनोभावे त्यांची दररोज पूजा केली जात आहे.