कळंबोली रेल्वे स्थानकात ऑक्सीजन एक्सप्रेस दाखल - Oxygen Express arrives at Kalamboli railway station
मुंबई - दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रशासकीय स्तरावर पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. सध्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात, राज्यात आणि देशात रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे गुजरातमधून येणारे ऑक्सिजनने भरलेले 3 ट्रक हे ऑक्सिजन एक्सप्रेस च्या माध्यमातून नवी मुंबईतील कळंबोली रेल्वे स्थानक येथे दाखल झालेले आहेत.