उस्मानाबादच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांची उत्तरे... 'बघतो, पाहतो, सांगतो, माहिती घेतो'! - उस्मानाबाद जिल्हा बातमी
उस्मानाबाद - पालकमंत्री शंकर गडाख यांनी जिल्हा आढावा बैठक घेतली. पालकमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शंकर गडाख यांची ही पहिलीच बैठक होती. बैठकीनंतर गडाख यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत स्थानिक प्रश्नांना सफाईने बगल दिली. त्यांनी प्रत्येक प्रश्नाला माहिती घेतो, सांगतो, कळवतो अशी उत्तरे दिली. त्यांनी कोणत्याही प्रश्नाला उत्तर न दिल्यामुळे त्यांना जिल्ह्यातील प्रश्नांची माहिती आहे की नाही? असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे.