बेंबळीतील विद्यार्थी घरबसल्या घेतायेत ऑनलाईन 'स्कूलिंग'चा आनंद - विद्यार्थी घरबसल्या घेतायेत ऑनलाईन स्कुलींगचा आनंद
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे 'धम्माल' करायची हा बच्चे कंपनीचा ठरलेला प्लॅन असतो. त्यात उन्हाळ्याची सुट्टी एक महिना अगोदरच मिळाल्याने बच्चे कंपनी खुश आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांना बाहेर खेळताही येत नाही. परीक्षा होणार असल्या तरी घरी असलेल्या मुलांना व्यस्त कसं ठेवायचं, त्यांचा अभ्यास-खेळ यांची सांगड कशी घालायची हा प्रश्न पालकांसमोर उभा होता. मात्र, बेंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी सुरू केलेल्या ऑनलाईन स्कूलिंगमुळे हा प्रश्न सुटला आहे.