firing : पालघर येथे अज्ञाताच्या गोळीबारात एक जण जखमी - firing incident
पालघर - येथे एका व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार (firing) केल्याची घटना मंगळवारी (दि. 16) रात्री घडली. जावेद लुलानिया, असे गोळीबारमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून (palghar police) मिळालेली माहिती अशी की, जावेद लुलानिया यांचे चिकनचे दुकान आहे. ते दुकानात असताना दुचाकीवरुन दोन अज्ञात व्यक्ती आले त्यापैकी एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी लुलानिया यांच्या पाठीत लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना तत्काळ मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक (SP) दत्तात्रय शिंदे हे पोलीस पथकासह घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.