रिसोडमध्ये बिछायत गोडाऊनला आग; एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी - रिसोडमधील बिछायत केंद्राला आग
वाशिम - जिल्ह्यातील रिसोड येथील सराफा लाइन परिसरातील एका बिछायतच्या गोडाऊनमध्ये गैसच्या विस्फोटमुळे भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमधील दोन जण भाजले असून एका 16 वर्षाच्या मुलाचे मृत्यू झाले आहे. तर एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या आगीमुळे गोडाऊनमधील लाखो रुपयांचा मालही जळून खाक झाला आहे. परीसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर रिसोड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.