जालन्यात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली; दबून एकाचा मृत्यू - jalna rain news
जालना - शहरात पावसाच्या पाण्याने भिंत अंगावर कोसळून एका जणाचा मृत्यू झाला आहे. परशुराम म्हस्के असे मृत्यू झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. शहरातील भीमनगर परिसरात ही घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भिंतीमध्ये पावसाचे पाणी शिरुन भिंत कोसळली. या भिंतीखाली दबून म्हस्के यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचे समोर आले.