VIDEO : नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची ब्रह्माणी मातृका रुपात पूजा - Ambabai Brahmani Matruka pooja
कोल्हापूर - शारदीय नवरात्र उत्सवात आज पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ब्रह्माणी मातृका रुपात पूजा बांधण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार सकाळपासूनच ई पासद्वारे भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. नवरात्रोत्सव काळात अंबाबाईची पूजा पाहण्यासाठी लाखो भाविक येत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका तासाला केवळ 700 लोकांना दर्शन दिले जात आहे. दरम्यान, आजच्या या पूजेबाबत अधिक माहिती दिली आहे श्रीपूजक चेतन चौधरी यांनी...