तेल सांडल्याने मुंबईची जुहू चौपाटी काळवंडली - mumbai oil spills
मुंबई - जुहू चौपाटीवर गुरूवारी मोठ्या प्रमाणात तेलाचा तवंग पसरलेला होता. किनाऱ्यावर सहा किलोमीटरवर पूर्ण तेल पसरले होते. वाळू काळी पडली होती. जहाजातील तेल समुद्रात पडल्याने किनाऱ्यावर काळा तवंग पसरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नक्की पाण्यावर हा काळा तवंग कशामुळे आला याचा शोध सुरू आहे. भारतीय तटरक्षक दलाकडून देखील अद्याप कोणतीही माहिती यासंदर्भात देण्यात आलेली नाही. मात्र, दर पावसाळयात अशा तेलाचे तवंग कमी अधिक प्रमाणात जुहू बीच परिसरात बघायला मिळत असतात.हा तवंग समुद्री जीवासाठी घातक आहे. सुरक्षिततेच्या कारणासाठी जुहू चौपाटी पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे. सध्या महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून साफसफाई करण्यात येत आहे.