जहांगीर रुग्णालयातील नर्सिंग स्टाफचे मुख्यमंत्र्यांना साकडे - जहांगीर रुग्णालय नर्सिंग स्टाफ मुख्यमंत्री मदत
पुणे - जहांगीर रुग्णालयाच्या नर्सिंग स्टाफने आज सकाळी विविध मागण्यांसाठी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. रुग्णालय प्रशासन गेल्या चार महिन्यांपासून आमच्यावर अन्याय करत आहे. हॉस्टेलवर येऊन धमक्या आणि शिवीगाळ झाल्याचे आरोप नर्सिंग स्टाफने रुग्णालय प्रशासनावर केले आहेत. आंदोलनादरम्यान रुग्णालय प्रशासनाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आले मात्र, त्यातही त्यांचा मुजोरपणा समोर आला. जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनीच न्याय द्यावा, अशी मागणी निर्सिंग स्टाफने केली आहे.
Last Updated : Jul 26, 2020, 11:29 PM IST