पावसाळ्यापूर्वी दिल्या होत्या नोटिसा - अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे - मुंबई पाऊस बातमी
मुंबई - विक्रोळीतील सूर्यनगर येथील दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोट दाखवले आहे. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली ती जागा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारितील होती. या परिसरातील संरक्षक भिंती तत्काळ दुरुस्त कराव्यात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला होता. पण, पावसाचे प्रमाण वाढल्याने ही दुर्घटना घडली. या परिसरातील नागरिकांना पावसाळ्यापूर्वी नोटिसही देण्यात आली होती, अशी माहिती मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.