Jalgaon Municipal Corporation : जळगाव महापालिकेच्या 27 बंडखोर अन 2 भाजप नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस - BJP Corporator
जळगाव - महानगरपालिकेच्या ( Jalgaon Municipal Corporation ) भाजपचे 27 बंडखोर व 2 भाजप नगरसेवकांना ( BJP Corporator ) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटीस बजावली आहे. प्रभाग समिती निवडणुकीत व्हीप न पाळल्याने याबाबत गटनेते दिलीप पोकळे यांनी विभागीय आयुक्तांकडे 29 नगरसेवकांना अपात्र कराण्याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवरुन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 29 नगरसेवकांना नोटीस बजावल्या आहेत.दरम्यान, 29 नगरसेवकांसह जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत नाशिक येथे सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश नोटिशीद्वारे विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
Last Updated : Jan 4, 2022, 4:59 PM IST