चंद्रपूर : जिल्ह्यातील 14 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाचे पत्र, आंदोलन सुरू ठेवण्यावर ठाम - चंद्रपूर
चंद्रपूर - मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर चंद्रपुरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर आणि राजुरा आगारातील एकूण 14 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबन नाही तर सेवासमाप्तीची कारवाई केली तरी एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण होईपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांचनी घेतली आहे.
Last Updated : Nov 9, 2021, 7:34 PM IST