अर्थसंकल्पीय अधिवेशनात नितेश राणेंची शिवसेनेवर टीका - अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई
मुंबई - भाजप आमदार नितेश राणे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील कायदा आणि सुव्यावस्थेवरील चर्चेदरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणातील उल्लेखासह विविध मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले राज्यपालांच्या अभिभाषणात राज्य अर्थिक संकटात असल्याचा उल्लेख आहे. मात्र, राज्य सरकारमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामुळे अर्थिक संकट आले आहे का, याचा विचार व्हायला हवा. सरकारमधील भ्रष्टाचार फक्त अधिकाऱ्यांपुरता आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सरदेसाई कोण आहेत. त्यांना वाय प्लस सुरक्षा का दिली, हे कळले पाहिजे असे ही ते म्हणाले. यासह विविध महत्वाच्या मुद्द्यावंर त्यांनी भाष्य केले.