महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

छोट्या चिमुरडीला दारू पाजून नऊ वर्षीय मुलीवर बापानेच केला अत्याचार! पाहा व्हिडिओ...

By

Published : Oct 30, 2021, 6:12 PM IST

ठाणे - बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ९ वर्षीय अल्पवयीन पोटच्या मुलीवरच ४९ वर्षीय नराधम बापाने अत्याचार केला. ऑक्टोबर महिन्यातच पुन्हा एका दिवशी बेडरूममधून मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने आईने विचारले असता नराधम बापाने दरवाजा न उघडता आईला झोपण्यास सांगितले. त्यानंतर सकाळच्या सुमारास आईने पीडित मुलीला रात्री काय झाले का रडत होती विचारले असता पीडित मुलीने बापाच्या कृत्याच्या पापाचा पाढाच वाचला होता. त्यानंतरही आरोपी बापाने पीडित मुलीसोबतच ८ महिन्याच्या मुलीला दारू पाजणे, पत्नीला बेदम मारहाण असे प्रकार सुरू ठेवल्याने अखेर आईने शुक्रवारी विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडत असलेल्या प्रसंगाचे कथन केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापाविरोधात भादंवि कलम ३७६ (अ ) (ब ) ३५४ (अ ) ३२३, ५०६, ५०४ सह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून काही तासातच त्याला अटक केली आहे. यापुर्वीही त्याने त्या पीडितेवर अत्याचार केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details