Night Curfew in Pune : मध्यरात्रीपासून पुण्यात नाईट कर्फ्यूला सुरुवात; 'ई टीव्ही भारत'चा ग्राऊंड रिपोर्ट - पुण्यात 9 जानेवारीपासून रात्रीची संचारबंदी सुरू
पुणे - राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाच्या (Corona Hike) पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने नवीन निर्बंध (Strict Restrictions) लावण्यात आहे आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून राज्यात नाईट कफ्यू (Night Curfew in Pune) लावण्यात आला आहे. पुण्यातही चौकाचौकात पुणे पोलिसांच्यावतीने नाकाबंदी करण्यात आली आहे. कोरोना नियमांचे पालन करा असे आवाहन सुरुवातीला पोलिसांकडून नागरिकांना करण्यात येत आहे. हे आवाहन नागरिकांनी पाळले नाही तर रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी दिला आहे. पुण्यात लावण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी...