VIDEO : राज्यात आजपासून रात्रीची संचारबंदी तर दिवसा जमावबंदी लागू - Maharashtra corona update
राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने सरकारने आज रात्रीपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यात रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी तर सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयातही 50 टक्के उपस्थिती करण्यात आली असून बाहेरून येणाऱ्यांना कार्यालयात बंदी घालण्यात आली आहे. मंदिरे आणि दारूच्या दुकानामध्ये गर्दी झाल्यास त्याठिकाणीही निर्बंध लागू करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. रुग्णसंख्या वाढल्यास निर्बंध कडक करण्याचा तर रुग्णसंख्या कमी झाल्यास निर्बंध शिथिल करण्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. याचा आढावा घेतलाय ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अजेयकुमार जाधव यांनी..